कल्याणमधील नाले सफाईविनाच

June 1, 2010 11:54 AM0 commentsViews: 19

विनय म्हात्रे, कल्याण

1 मे

26 जुलैच्या तडाख्यात मुंबईपाठोपाठ कल्याण शहरात मोठ्या प्रमाणावर हाह:कार माजला होता. याला कारण ठरले होते, तेथील नाले…

या अनुभवातूनही कल्याण-डोंबिवली महापालिकेला जाग आलेली दिसत नाही. शहरातील नालेसफाईसाठी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तरीही नाल्यांची अवस्था आहे तशीच आहे.

शहरात एकूण 24 नाले आहेत. त्यातील 60 टक्के नालेसफाईची कामं पूर्ण झाल्याचे महापालिका सांगत आहे. तर उर्वरित नालेसफाई 31 मे पूर्वी होणार असल्याचे सांगितले जात होते.

आचारसंहितेमुळे नालेसफाईला उशीर झाल्याचे मनपा अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. या नालेसफाईसाठी एकूण 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

जेएनएनआरयूएमच्या माध्यमातून शहरात बंदिस्त गटारे बांधली गेली. पण त्यांचीही सफाई करण्यात आली नाही.

शहरातील संपूर्ण नालेसफाईचे काम एकाच ठेकेदाराला दिले गेले नाही. उलट आयुक्तांच्या 10 लाखांच्या आतील कामांच्या अधिकारांचा वापर करत ही कामे वेगवेगळया ठेकेदारांना देण्यात आली.

शासनाने नाले सफाईसाठी 50 लाख रुपयांची तरतूद केली. 31 मे पूर्वी शहरातील सर्व नालेसफाई होणार करणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत होते. पण नाल्यांची सध्याची परिस्थिती पाहता हा खर्च नक्की कुठे गेला, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

महापालिकेच्या नालेसफाईत नेमके काय दडले आहे ते शोधून काढणे गरजेचं असल्याचे विरोधक म्हणत आहेत. प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आता लोकांनीच जागरूकपणा दाखवत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कामकाजावर लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे.

close