नाशिकमधील नालेच गायब

June 1, 2010 12:17 PM0 commentsViews: 4

दीप्ती राऊत, नाशिक

1 जून

नदीनाल्यांचे शहर म्हणून नाशिकची एके काळी ओळख होती. पण सध्या नाशिकमधील नालेच गायब करण्यात येत आहेत.

काही नाले बिल्डर्ससाठी वळवण्यात आलेत तर काही नाले पावसाळी गटारांसाठी बुजविण्यात आलेत. त्यामुळे पावसाळी गटार योजनेचे पार तीन तेरा वाजलेत…

पावसाळ्याच्या तोंडावर सगळीकडे नालेसफाई मोहीम राबवली जातेय. नाशिकमध्ये मात्र नालेशोध मोहीम सुरू झाली आहे.आता नाल्यांच्या फक्त आठवणीच सांगितल्या जात आहेत…

चित्रमंदिरजवळ नाशिकमधला सर्वात जुना नाला होता. तो बुजवला. आता ते पाणी मेनरोडवर भरते. बालाजी कोटाचा एक नाला होता. तोही बंद केला गेला आहे.

नाले पावसाचे पाणी वाहून नेत असतात. पण नाशिकमधील पावसाळी गटार योजनेसाठी हे नालेच बुजवण्यात येत आहेत.

नाशिकमध्ये 130-40 नाले होते. पावसाळी गटार योजनेत त्यापैकी 30-40 नाले बंदिस्त केले गेले. विशेष म्हणजे आत्ता नाशिकमध्ये नेमके किती माले आहेत, कुठे आहेत याची माहिती नगररचना विभागाकडेही नाही.

नाले गेले कुठे? उत्तर थेट आहे याचे थेट उत्तर मिळते, बिल्डर्सच्या घशात!

यामुळे पाणी मुरणार नाही, भूखंड बिल्डर्सच्या घशात जातील आणि उद्या पूर आला तर पाणी उलटे शिरेल.आणि त्यावेळी निसर्गाला दोष देत महापालिका प्रशासन हात वर करेल…

close