वारकर्‍यांना आषाढीचे वेध

June 1, 2010 12:23 PM0 commentsViews: 6

1 जून

मान्सूनसोबतच वारकरी, शेतकर्‍यांना पंढरीच्या विठूरायाच्या आषाढी वारीचे वेध लागले आहेत. 21 जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा आहे.

त्यासाठी तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 3 जुलैला, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून 5 जुलैला पंढरपूरकडे रवाना होणार आहे.

या दोन्ही पालख्या 6 जुलैला पुण्यात एकत्र येणार आहेत. त्यानंतर दोन्ही पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरकडे रवाना होतील.

एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजेच 20 जुलैला पालख्या पंढरपुरात दाखल होतील.

या आषाढी सोहळ्याची तयारी आता सुरू झाली आहे.

close