सहीपूर्वीच बदल्यांची यादी फुटली

June 1, 2010 2:34 PM0 commentsViews: 2

1 जून

राज्यातील 70 वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी संबंधित फाईलवर सही होण्याआधीच फुटली आहे. त्यामुळेया बदल्यांमध्ये फेरफार करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

या फाईलवर गृहमंत्री आर. आर. पाटील आणि मुख्यमंत्र्यांची सही झाल्यानंतर पोलीस ती महासंचालकांकडे आली आहे.

पण यादी अंतिम करू नये, असा दबाव काही राजकारण्यांशी जवळीक असलेले अधिकारी पोलीस महासंचालकांवर आणत आहेत.

त्यामुळे या बदल्यांच्या ऑर्डर्स निघू शकलेल्या नाहीत.

close