नक्षलवादासाठी दुहेरी धोरण

June 1, 2010 5:39 PM0 commentsViews: 4

1 जून

नक्षलवादा आटोक्यात आणण्यासाठी नक्षलग्रस्त भागात विकासकामे आणि नक्षलवाद्यांवर कठोर कारवाई असे हे दुहेरी धोरण राबवले जाई, असे आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जाहीर केले.

यूपीएला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज सरकारचे प्रगतीपुस्तक सादर केले. यात सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा आणि यापुढील आव्हाने यांचा लेखाजोखा आहे.

यात अर्थव्यवस्था मजबूत करणे, सामाजिक न्याय, प्रादेशिक असमतोल दूर करणे, उद्योगांना प्राधान्य देणे या बाबींवर भर देण्यात येईल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.

24 मे रोजी हे प्रगती पुस्तक जाहीर केले जाणार होते. पण मेंगलोर विमान अपघातावर ते लांबणीवर पडले होते.

close