विद्यार्थ्यांची रिक्षातील वाहतूक होणार बंद

June 4, 2010 12:19 PM0 commentsViews: 2

4 जून

शालेय विद्यार्थ्यांची रिक्षातून होणारी वाहतूक आता बंद होण्याची शक्यता आहे. येत्या तीन वर्षात ही बंदी घालण्याचा प्रस्ताव परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठेवला आहे.

सुरूवातीला महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांची रिक्षा वाहतूक बंद करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या शालेय बसच्या धोरणाबद्दल परिवहन विभागाने आज मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण केले.

यावेळी परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या प्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन अंतिम मंजुरी दिली जाणार आहे.

या प्रस्तावातील मुद्दे पुढीलप्रमाणे…

महानगरपालिका क्षेत्रात एका वर्षानंतर रिक्षातून शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर बंदी आणली जाणार

नगरपालिका क्षेत्रात दोन वर्षांनंतर आणि इतर भागात तीन वर्षांनंतर बंदी आणली जाणार

परमीटशिवाय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यावर बंदी घालण्यात येणार

शाळेच्या बसला अपघात झाला तर संबंधित मुख्याध्यापकांना जबाबदार धरणार

शाळेने एसी बस सुरू केली, तर पूर्णत: टॅक्स सवलत दिली जाणार

नव्या बसेस सुरू केल्यास शाळांना टॅक्समध्ये सवलत मिळणार

प्रत्येक बसला खिडक्यांना संरक्षक जाळ्या लावणे बंधनकारक

बसमध्ये संकटकालीन दरवाजे अनिवार्य

खाजगी बसेसचा स्कूलबस म्हणून वापर करावयाचा असल्यास परमीट आवश्यक

close