इंडियन मुजाहिद्दीनवर बंदी

June 4, 2010 12:31 PM0 commentsViews: 1

4 जून

इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेवर अखेर बंदी घालण्यात आली आहे.

इंडियन मुजाहिद्दीन ही अतिरेकी संघटना असल्याचा ठपका गृहमंत्रालयाने ठेवला आहे.

या संघटनेवर बंदी घालावी, अशी विनंती दिल्ली पोलिसांनी गृहमंत्रालयाकडे केली होती.

देशभरात अनेक ठिकाणच्या हिंसक घटना आणि कारवायांमध्ये इंडियन मुजाहीद्दीनचा हात असल्याचे अनेक वेळा स्पष्टही झाले होते.

त्यांच्यावर बंदीची मागणीही अनेक वेळा करण्यात आली होती.

अखेर इंडियन मुजीहिद्दीन ही अतिरेकीच संघटना असल्याचे सांगत, त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

close