लंचपर्यत भारताच्या दुस-या इनिंगमध्ये दोन विकेटवर 230 रन्स

October 20, 2008 6:01 AM0 commentsViews: 6

दिनांक 20 ऑक्टोबर, मोहोली-पहिल्या दिवसापासूनच या टेस्टवर भारताने पकड घेतली होती. आज चौथ्या दिवशी चारशे रन्सची आघाडी आहे. सेहवाग आणि गंभीर यांनी दुस-या इनिंगमध्ये एकशे ब्याऐशी रन्सची ओपनिंग पार्टनरशीप टीमला करून दिली. सेहवाग हमखास सेंच्युरी ठोकणार असं वाटत असतानाच 90 रन्सवर आऊट झाला. पीटर सिडलने त्याला आऊट केलं. पण दुस-या बाजूने गंभीरने आपली आगेकूच सुरू ठेवली.आज खेळ सुरू झाल्यावर पहिल्या अर्ध्या तासातच गंभीरने आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली. ऑस्ट्रेलिया विरुद्धची गंभीरने पहिली सेंच्युरी मारली. 102 रन्सकरून गंभीर आऊट झाला. सेहवाग आऊट झाल्यावर राहुल द्रविड ऐवजी महेंद्रसिंग ढोणी मैदानावर आला आहे. त्यामुळे झटपट रन करून ऑस्ट्रेलियासमोर मोठं आव्हान ठेवण्याचा भारताचा इरादा स्पष्ट आहे.

close