कसाबने केली वकिलाची मागणी

June 4, 2010 12:43 PM0 commentsViews: 1

4 जून

फाशीच्या शिक्षेला कोर्टात आव्हान देण्यासाठी 26/11च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याने वकिलाची मागणी केली आहे.

मुंबई हल्ल्याप्रकरणी कसाबला विशेष कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. आता एका महिन्यानंतर कसाबने या शिक्षेला हायकोर्टात आव्हान देण्यासाठी वकिलाची मागणी केली आहे.

कसाबला ही मदत द्यायची किंवा नाही, याबाबत 'फ्री लिगल एड' निर्णय घेणार आहे.

भारतीय न्यायव्यवस्थेनुसार प्रत्येक आरोपीला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्याप्रमाणे कसाबलाही बाजू मांडण्याची संधी दिली जाऊ शकते.

close