रावतेंनी घेतला खैरेंचा समाचार

June 4, 2010 3:15 PM0 commentsViews: 5

4 जून

औरंगाबाद महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीतून सध्या शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष सुरू आहे. याचवेळी शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीही चव्हाट्यावर आली आहे.

शिवसेनेचे उपनेते दिवाकर रावते यांनी औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार आणि उपनेते चंद्रकांत खैरे यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. तीही जाहीर… शिवसेनेच्या औरंगाबादमधील पहिल्या शाखेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमातच रावतेंनी हे खडे बोल सुनावले.

जुन्या शिवसैनिकांचा खैरे यांना विसर पडला आहे. शिवसेनेसाठी जिवाचं रान करणारे सच्चे शिवसैनिक कुठे आहेत? प्रदीप जैस्वाल कुठे आहेत? त्यांनी शिवसेनेसाठी काहीच केले नाही का? त्यांना परत आणण्यासाठी कुणी गेले होते का? असे सवाल रावतेंनी उपस्थित केले.

आणि आपण कार्यकर्त्यांचे पाय खेचायचे नसतात. अशाने पक्ष वाढणार नाही, असा सल्लाही त्यांनी खैरेंना दिला.

दरम्यान दिवाकर रावतें यांनी माझ्यावर टीका केली नाही, तर सल्ला दिला आहे, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे

close