मराठमोळ्या तुतारीचा मॉरिशसमध्ये गौरव

June 4, 2010 5:14 PM0 commentsViews: 2

4 जून

सण, समारंभाच्या निमित्ताने इतिहास जागवणारी, नवी स्फूर्ती देणारी मराठीमोळी तुतारी अजूनही हमखास दिसते. गेले कित्येक वर्षे ही तुतारी वाजवत संस्कृती जपणारे मुंबईचे पांडुरंग गुरव यांचा मॉरिशसमध्ये सत्कार करण्यात आला.

मॉरिशसमध्ये नुकताच मॉरिशस मराठी मंडळ फेडरेशनचा 50 व्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित महाराष्ट्र संस्कृती दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यामुळे मॉरिशिसमध्ये पहिल्यांदाच तुतारीचा आवाज घुमला.

गेली 20 वर्षे गुरव तुतारी वादनाचे काम करत आहेत. आतापर्यर्ंत त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये तुतारी वादन केले आहे.

close