बळी नव्हे हत्या…

June 4, 2010 5:18 PM0 commentsViews: 1

4 जून

नाशिकमधील सिन्नर तालुक्यात गीता गांगड या आदिवासी महिलेचा नवसासाठी बळी दिल्याची चर्चा होती.

मात्र, हा बळी नसून चुलत सासर्‍याने तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभेळकर यांनी याविषयीचे सत्य उघड केले आहे.

दाभोळकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून ही बाब स्पष्ट केली. या प्रकरणात महिलेच्या सासर्‍यांसह तिघांना 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

close