वीरधवल परत करणार सरकारी घर

June 4, 2010 5:26 PM0 commentsViews: 3

4 जून

आंतरराष्ट्रीय स्वीमर वीरधवल खाडेला पुन्हा एकदा सरकारी कारभाराला पुन्हा एकदा सामोरे जावे लागले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणार्‍या वीरधवल खाडेला निकृष्ट दर्जाचे घर दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

घराची अवस्था अत्यंत वाईट असल्याने हे घर सरकारला परत करण्याचा निर्णय वीरधवल खाडेने घेतला आहे. त्याला ज्या बिल्डिंगमध्ये घर देण्यात आले आहे, ती बिल्डिंग 25 वर्ष जुनी आहे. घराची दारे आणि खिडक्या तुटल्या आहेत. बिल्डिंगच्या शेजारीच नाला वाहत आहे.

कोल्हापूरमधील नागाळा पार्क येथील लवकुश अपार्टमेंटमध्ये वीरधवलला 430 स्केअर फुटांचे घर देण्यात आल्याचे पत्र कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

पण हे घर सरकारला परत करण्याचा निर्णय वीरधवलने घेतला आहे.

close