अफजल गुरुची फाईल अखेर गृहमंत्रालयाकडे

June 4, 2010 5:32 PM0 commentsViews: 2

4 जून

पार्लमेंटवर हल्ला केलेल्या अफजल गुरुच्या फाशीची फाईल आता अखेर केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे.

अफजल गुरुच्या फाशीबाबत लवकर निर्णय होत नसल्याचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला होता.

दिल्लीचे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यामध्येच या फाईलची देवाण-घेवाण होत होती. त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी ही फाईल शेवटची प्रक्रिया करून 19 मे रोजी राज्यपालांकडे पाठवली होती. आणि आता ती राज्यपालांकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली आहे.

पण त्याआधीच ही फाईल पुढे सरकवण्यासंदर्भात गृहमंत्रालयाने गेल्या 4 वर्षांत दिल्ली सरकारला 16वेळा सूचना पाठवल्या होत्या.

2001 मध्ये संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी अफजल गुरुला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या हल्ल्यात 13 लोकांचा मृत्यू झाला होता.

close