औरंगाबादमध्ये सेना-भाजप वाद वाढला

June 5, 2010 8:51 AM0 commentsViews: 3

6 जून

औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप वाद वाढतच चालला आहे.

काही लोकांनी आज भाजपचे नगरसेवक महेश माळवतकर यांची मोटरसायकल पेटवून दिली.

शिवसैनिकांनीच ही मोटरसायकल जाळल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच कालचा 'सामना'मधील बाळासाहेबांचा अग्रलेखही औरंगाबादमध्ये जागोजागी लावण्यात आला आहे.

या अग्रलेखात बाळासाहेबांनी भाजपवर तीव्र टीका केलेली आहे.

close