मोदींचा चिरायूंवर निशाना

June 5, 2010 12:23 PM0 commentsViews: 5

5 जून

आयपीएलचे निलंबीत कमिशनर ललित मोदी यांनी शरद पवार यांची पाठराखण केली. पण त्याच वेळी त्यांनी आयपीएलचे अंतरिम कमिशनर चिरायू अमीन यांच्यावर मात्र निशाणा साधला आहे.

पुणे टीमच्या लिलावाच्या बोलीत चिरायू अमिन यांचा समावेश असल्याची माहिती मोदी यांनी दिली. आणि याला उत्तर दिले आहे ते बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी.

मोदी हे बीसीसीआयची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत असल्याचे शशांक मनोहर यांनी म्हटले आहे. अमीन यांनी लिलावात भाग घेतला नाहीच, उलट पुणे फ्रँचायझीला अमीन यांच्याशी संपर्क करायला मोदी यांनीच सांगितले होते, असा आरोप शशांक मनोहर यांनी केला आहे.

अमिन यांची कबुली

विशेष म्हणजे मोदींचा आरोप अमिन यांनीही मान्य केला आहे. पुणे टीमच्या लिलावाच्या बोलीच्या वेळी एका कन्सोर्टीयमची स्थापना करण्यात आली होती. आणि त्यावेळी काही बिझनेसमन्सनी आपल्याशी संपर्क साधला होता, असे त्यांनी म्हटले आहे.

त्यावेळेला मी 10 टक्के गुंतवणूक करण्याचे आश्वासन त्यांना दिले होते, असेही चिरायू अमिन यांनी स्पष्ट केले आहे. पण या सर्व घडामोडींबाबत आपण बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या संदर्भात कोणताही आर्थिक व्यवहार झाल्यास त्यासाठी अधिकृत परवानगी घेण्याचे आश्वासन मी बीसीसीआयला दिले होते, असा खुलासाही त्यांनी केला आहे.

close