हेडलीची थेट चौकशी सुरू

June 5, 2010 12:54 PM0 commentsViews: 5

5 जून

एनआयए म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने डेव्हिड हेडलीची थेट चौकशी सुरू केली आहे.

हेडली हा मुंबईवरच्या हल्ला प्रकरणातील आरोपी आहे. हेडलीचा वकील आणि एफबीआयचे अधिकारीही या चौकशीच्या वेळी उपस्थित असल्याचे समजते.

पण ही चौकशी किती दिवस चालणार, याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. चौकशी संपल्यानंतर भारत-अमेरिका संयुक्त निवेदन सादर करण्याची शक्यता आहे.

मुंबईवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी हेडलीककडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

close