मिडोरी टॉवरला मिळणार परवानगी

June 5, 2010 3:23 PM0 commentsViews: 3

5 जून

पूररेषा बदलून बांधल्या गेलेल्या पिंपरीतील मिडोरी टॉवरवर फक्त दंडात्मक कारवाई करून त्या इमारतीतील अवैध बांधकामाला परवानगी देण्याचा घाट पिंपरी चिंचवड महापालिकेने घातला आहे.

पिंपरी-चिंचवड येथील नदीची पूररेषा बदलून हा मिडोरी टॉवर उभारला गेला.निवृत्त जलसंपदा सचिव व्यंकटराव गायकवाड यांनी त्यांचा मुलगा विक्रम गायकवाड याच्या या बांधकामासाठी पूररेषा बदलल्याचा आरोप जलसंपदा खात्यातीलच एका कर्मचार्‍याने केला.

आठ मजल्यांची परवानगी मिळाल्यानंतर नियम धाब्यावर बसवून बारा मजले उभारण्यात आले. तसेच फायर ब्रिगेडची एनओसी न घेता आणि नाला बुजवून ही इमारत बांधली गेली.

या बिल्डरवर कारवाई करण्यासाठी पिंपरी चिंचवडचे आयुक्त टाळाटाळ करत होते. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले. त्यानंतर आज येथील सीटी इंजीनिअरने पत्रकार परिषद घेऊन या इमारतीवर फक्त दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

close