नालेसफाईचा दावा फोल

June 5, 2010 4:05 PM0 commentsViews: 4

5 जून

मुंबईतील नालेसफाई 95 टक्के पूर्ण झाल्याचा महापालिकेचा दावा फोल ठरला आहे. अजूनही अनेक नाल्यांची सफाईच झाली नसल्याचे उघड झाले आहे.

'हिंदुस्थान टाइम्स' आणि 'आयबीएन-लोकमत'ने केलेल्या पाहणीत दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत ज्या नाल्यांना पूर येऊन मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो, त्या नाल्यांची सफाईच झाली नसल्याचे उघड झाले आहे.

नालेसफाईसाठी महापालिकेने 72 कोटी रुपयांचे काँट्रॅक्ट दिले आहे. पण अजूनही शहरात फक्त 60 टक्केच नालेसफाई झाली आहे.

मुंबईकरांना त्रासदायक ठरणारे नाले पुढीलप्रमाणे -

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील मजास नाला – जोगेश्वरी ईस्ट आणि वाकोला ते पवई या भागाला पुराचा फटका बसू शकतो.

वडाळा – जे. के. केमिकल्स नाला – भक्ती पार्क, अँटॉप हिल आणि मेट्रो रेल्वेच्या काही भागांना याचा फटका बसू शकतो.

कुर्ला – क्रांतीनगर नाल्याची सफाई पूर्ण. पण विमानतळाखालून जाणार्‍या या नाल्याची रुंदी अजूनही वाढवण्यातआलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात विमानतळ, कुर्ला आणि कलिना या भागांना फटका बसू शकतो.

वांद्रे पूर्व – बेहरामपाडा नाला – आजूबाजूला झोपडपट्टीचा भाग. इथे पाऊस झाला तर वांद्रे पूर्व भागाला फटका बसेल त्याचसोबत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरही वाहतुकीला फटका बसू शकतो.

सांताक्रूझ – मिलन सबवे जवळील गोबर नाला – इथे असलेल्या गोठ्यांतील शेण नाल्यात टाकले जाते. त्यामुळे यंदाही मिलन सबवेमध्ये पाणी भरून वाहतुकीला फटका बसू शकतो.

close