भारताचा दारूण पराभव

June 5, 2010 4:39 PM0 commentsViews: 6

5 जून

झिम्बाब्वेमधील ट्रँग्युलर सीरिजमध्ये भारताचा दारूण पराभव झाला आहे. भारताला या सीरिजमध्ये तब्बल तीन पराभवाला सामोरे जावे लागले. आणि या पराभवामुळे भारताचे वन डे रँकिंगमधील स्थानही घसरले आहे.

वन डे रँकिंगमध्ये भारतीय टीम आता तिसर्‍या क्रमांकावर फेकली गेली आहे. भारताच्या खात्यात 118 पॉईंट आहेत. 133 पॉईंटसह ऑस्ट्रेलियाची टीम पहिल्या क्रमांकावर आहे.

तर वेस्ट इंडिजविरुध्दची सीरिज 5-0 ने जिंकणारी दक्षिण आफ्रिकेची टीम 119 पॉईंटससह दुसर्‍या क्रमांकावर पोहचली आहे.

इतकेच नाही तर महेंद्र सिंग धोणीचीही वन डे क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर घसरण झाली आहे. वन डे बॅट्समन क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या मायकेल हसीने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर धोणी 807 पॉईंटसह दुसर्‍या क्रमांकावर आहे

close