पवारांचा खोटारडेपणा उघड

June 5, 2010 5:41 PM0 commentsViews: 1

5 जून

आयपीएलमधील पुण्याच्या टीमसाठी बोली लावण्याकरिता सिटी कॉर्पोरेशनने अनिरुद्ध देशपांडे यांना परवानगी दिली नव्हती. तर ते वैयक्तिकरित्या या लिलावात सहभागी झाले होते, असे शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले होते.

पण कंपनीने एका ठरावाद्वारे देशपांडे यांना याबाबतची परवानगी दिल्याचे उघड झाले आहे. या ठरावाची प्रत मीडियाला उपलब्ध झाली आहे.

31 जानेवारी 2010 रोजी झालेल्या सिटी कॉर्पोरेशनच्या बोर्ड मिटींगमध्ये अनिरुद्ध देशपांडे यांना संचालक मंडळांने ही परवानगी दिली. त्यामुळे अनिरुद्ध देशपांडे हे वैयक्तिकरित्या या बोलीत सहभागी झाले नव्हते, हे आता स्पष्ट झाले आहे.

पण या कागदपत्रांमुळे पवारांपुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत.

close