आरबीआयनं रेपो रेट एक टक्क्यांनी कमी करून आठ टक्के केला.

October 20, 2008 12:13 PM0 commentsViews: 8

दिनांक 20 ऑक्टोबर, मुंबई-आरबीआयनं देशातल्या चलनपुरवठ्याची आणि इतर आर्थिक समस्या लक्षात घेऊन आता रेपो रेटदेखील कमी केला आहे. पूर्वी नऊ टक्के असणारा रेपो रेट आता एक टक्क्यांनी कमी करून आठ टक्के करण्यात आला. रेपो रेट म्हणजे इतर बँका ज्या दरानं रिझर्व्ह बँकेकडून कर्ज उचलतात तो दर असतो. हे नवे दर आजपासूनच लागू होणार आहेत. आरबीआयनं महिन्याभरात सीआरआरदेखील अडीच टक्के कमी केला होता. सध्या सीआरआर साडेसहा टक्के आहे. रिझर्व्ह बँकेनं अशाप्रकारे सीआरआर आणि रेपो रेट कमी केल्यामुळे आता बँकाही त्यांचे व्याजदर कमी करतील अशी शक्यता आहे. 24 ऑक्टोबरला रिझर्व्ह बँकेची क्रेडिट पॉलिसी जाहीर होत आहे, त्यावेळी देखील नवीन काही बदल केले जातील असं तज्ज्ञ सांगत आहेत.

close