शिवराज्याभिषेकाची तयारी जय्यत

June 5, 2010 5:55 PM0 commentsViews: 3

5 जून

उद्या रायगडावर होणार्‍या 337 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून शिवप्रेमी रायगडवर दाखल झाले आहेत.

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला गडाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर युद्धकलेची प्रात्यक्षिके पार पडली. रात्री शाहिरी गीतांसोबतच भवानीमातेच्या गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

हा सोहळा खाजगी न्यूज चॅनलच्या इतिहासात पहिल्यांदाच 'आयबीएन-लोकमत'च्या माध्यमातून थेट रायगडावरून पाहता येणार आहे.

close