‘तुझी बॅट कायम अशीच दिसत राहो’, सचिनकडून ‘विराट’ कौतुक

February 13, 2017 6:28 PM0 commentsViews:

sachin_virat313 फेब्रुवारी : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या सध्याच्या खेळीने त्याचे चाहते चांगलेच खूष आहेत. इतकंच नाही तर चक्क क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही त्याच्या या खेळाच्या प्रेमात आहे. सचिनने शनिवारी केलेल्या ट्विटवरून हेच दिसून येतंय.

विराटने सलग चौथ्या सराव मालिकेत 246 चेंडूंत 24 चौकारांसह 204 धावा करत द्विशतक ठोकलं. यामुळे त्याने राहुल द्रविड आणि ऑस्ट्रेलियाचा खेळाडू रिकी पाँटींग यांचा तीन द्विशतक करण्याचा विक्रम मोडीत काढलाय. याआधी विराटने 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध 200, न्यूझीलंडविरूद्ध 211 आणि इंग्लंडविरूद्ध 235 धावा केल्या होत्या. टेस्ट क्रिकेटमध्ये तो सध्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे.

“विराट तुझ्या बॅटच्या मधोमध दिसणारा डाग तुझ्या सध्याच्या खेळाचा दर्जा दाखवत आहे. त्यासाठी कोणत्याही गुणफलकाची गरज नाही. देव करो आणि तुझी बॅट कायम अशीच दिसत राहो” असं सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close