आठवले राज्यसभा लढवणार नाहीत

June 7, 2010 12:01 PM0 commentsViews: 3

7 जून

रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी राज्यसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने पाठिंबा न दिल्यामुळे हा निर्णय रामदास आठवलेंनी घेतला आहे.

दुपारपर्यंत रिडालोसचे नेते मुख्यमंत्र्याच्या संपर्कात होते.

काँग्रेसने आपला तिसरा उमेदवार कन्हैयालाल गिडवाणी यांचा राज्यसभेचा अर्ज मागे घ्यावा आणि आठवले यांना काँग्रेसची अधिकची मते द्यावीत, त्या बदल्यात विधानपरिषद निवडणुकीत रिडालोस काँग्रेसच्या चौथ्या उमेदवारास मतदान करेल, असा फार्म्युला रिडालोसने काँग्रेससमोर ठेवला होता.

आता विधानपरिषद निवडणुकीत रिडालोसची मते कुणाला द्यायची या संदर्भात दोन दिवसांत निर्णय होणार आहे.

close