पेट्रोलची दरवाढ टळली

June 7, 2010 12:27 PM0 commentsViews: 6

7 जून

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सध्या तरी टळली आहे.

याबाबत आज अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगटाची बैठक झाली. पण या बैठकीला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी उपस्थित नव्हत्या.

या बैठकीत पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. याबाबत आता पुन्हा एकदा बैठक होणार आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीन ते साडेतीन रुपयांची दरवाढ होण्याची शक्यता आहे.

घरगुती गॅसच्या दरातही 25 ते 50 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

close