बेस्ट फाईव्हला पालकांचे आव्हान

June 7, 2010 12:52 PM0 commentsViews: 1

7 जून

अकरावी प्रवेशासाठी राज्य सरकारच्या बेस्ट फाईव्ह या निर्णयाला 21 पालकांनी मिळून मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे.

राज्य सरकारने 11 वी प्रवेशप्रक्रियेसाठी बेस्ट फाईव्ह सूत्र लावण्याचा निर्णय यंदा घेतला होता.

25 फेब्रुवारीला तसा जीआरही काढण्यात आला होता. परंतु आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाच्या पालकांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

एकीकडे एसएसएससी बोर्डाच्या दहावीचे निकाल जवळ येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अकरावी प्रवेशाचे टेन्शन आहे. त्यातच यंदा सुद्धा अकरावी प्रवेशाची प्रक्रिया कोर्टाच्या फेर्‍यात अडकणार आहे.

एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी त्यांच्या एकूण 6 विषयांपैकी दिली जात असे. मात्र केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांशी असलेली स्पर्धा लक्षात घेता सर्वाधिक गुण मिळवलेल्या 5 विषयांतीलच गुण यापुढे गृहीत धरण्यात येतील. आणि त्याआधारेच टक्केवारी काढली जाईल, असा निर्णय राज्यसरकारने घेतला होता.

यामुळे एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढेल आणि केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, असा पालकांचा आरोप आहे.

close