गडचिरोलीत अपहरणाचे सत्र

June 7, 2010 1:59 PM0 commentsViews: 4

7 जून

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती प्रीती गोडसेलवार यांचे पती श्रीनिवास गोडसेलवार यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले आहे.

यापूर्वीही अनेक वेळा नक्षलवाद्यांनी नागरिक, पोलीस यांना टार्गेट केले आहे. आत्तापर्यंत नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शेकडो पोलीस शहीद झालेत.

निरपराध नागरिकांचा छळ केला जात आहे. एटापल्ली तालुक्यातील नक्षल प्रभावित हालेवारा आणि देवडा भागातील रेशनिंगचे दुकान चालवणार्‍या वासुदेव गेडामचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले आहे.

त्याचसोबत हालेवाराचे उपसरपंच शंकर दातरवार यांचेही अपहरण करण्यात आले आहे. भीतीपोटी ते लग्नाला गेल्याचे लोक सांगतात. आणि याच गावातील श्रीनिवास गोडसेलवार या माजी सरपंचांचेही अपहरण करण्यात आले आहे.

गावात मैदानाचा विकास होत असताना, नक्षलवाद्यांना हे मैदान पोलीस स्टेशनसाठी आहे, या संशयावरून गोडसेलवारांचेही अपहरण झाले आहे.

close