मल्ल्यांच्या कंपनीत पवारांचे शेअर्स

June 7, 2010 2:11 PM0 commentsViews: 3

7 जून

आयपीएल पुणे टीमच्या बोली प्रकरणातील खुलासा अंगाशी आल्यानंतर आता शरद पवार सावध झाले आहेत. आता त्यांनी उद्योजक विजय मल्ल्या यांच्या यूबी ग्रुपमध्ये आपले शेअर्स असल्याचा खुलासा करून टाकला आहे.

यावरूनही आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काल बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना, बारामती ग्रेप्स असोशिएशन या कंपनीत आपले शेअर्स असल्याचे पवार यांनी सांगितले. पुढे ही कंपनी विजय मल्ल्या यांच्या यूबी ग्रुपने टेकओव्हर केली.

त्यामुळे विजय मल्ल्यांच्या बेंगलोर रॉयल चॅलेंजर्समध्ये माझे किंवा माझ्या कुंटुबीयांचे शेअर असल्याचा त्याचा अर्थ नाही, असेही पवार म्हणाले.

तर विजय मल्ल्या यांनीही पवारांची पाठराखण केली आहे. पवार यांचे यूबी ग्रुपमध्ये शेअर्स आहेत, याचा अर्थ असा होत नाही की त्यांचे रॉयल चँलेंजर बेंगलोरमध्ये शेअर्स आहेत, असे ते म्हणाले आहेत.

close