मूल होत नाही म्हणून विवाहितेला जाळले

June 7, 2010 2:32 PM0 commentsViews: 3

7 जून

मूल होत नाही म्हणून विवाहितेचा खून करुन तिला जाळल्याची घटना बीडमधील केज तालुक्यातील मुंडेवाडी इथे घडली. सासरच्या लोकांनी तिचा खून करून घरही पेटवून दिले.

या महिलेच्या डोक्यावर कोयत्याचे वार होते, असा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

मेडिकल रिपोर्टनुसार तपास करू, असे पोलिसांनी म्हटले आहे. पोस्टमॉर्टेममध्ये कारण स्पष्ट नसल्याने तपासाच्या दिशेवर परिणाम होईल, असे विवाहितेच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

दरम्यान या प्रकरणात पोलीस आणि वैद्यकीय अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे संबंधित पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मनिषाताई टोकले यांनी केली आहे.

close