पल्सर,केटीएमला टक्कर देण्यासाठी येतेय बीएमडब्ल्यू ‘G130 R’

February 15, 2017 6:16 PM0 commentsViews:

15 फेब्रुवारी : जर तुम्ही स्पोर्ट बाईकचे शौकिन आहात तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. आपल्या स्टाईलिश आणि लग्झरी गाड्यासाठी ओळखली जाणारी बीएडब्ल्यू ही कंपनी आता लवकरच आपली एक सुपरबाईक जी 310 आर सादर करणार आहे.

असं बोललं जातंय की, या बाईकची किंमत हार्ले डेव्हिसनपेक्षा कमी असेल. सध्या भारतात हार्ले डेव्हिडसनची किंमत 3 लाख 75 हजार रूपये बोलली जात आहे, तर जी310 आरची भारतीय बाजारात किंमत 2 लाख रूपयांपर्यंत असू शकते.

कंपनी या बाईकला येत्या मे महिन्यात सादर करेल. कंपनीने खास भारतातील तरूण वर्गाला लक्षात ठेवून या बाईकची निर्मिती केलेली आहे. या बाईकचा मुकाबला स्पोर्ट बाईक सेगमेटच्या बजाज पल्सर 400 आणि केटीएम डयूक यांच्या सोबत असेल. जर तुम्ही सुद्दा बाईक घ्यायचा विचार करत असाल तर या शानदार बाईकचा नक्की विचार केलाच पाहिजे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close