औरंगाबादेत काँग्रेसमध्येही कुरघोड्या

June 7, 2010 2:40 PM0 commentsViews: 1

7 जून

औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरू असतानाच काँग्रेसमध्येही अंतर्गत कुरघोड्यांच्या राजकारणाचे पडसाद उमटू लागले आहेत.

अवघ्या एक महिन्यात अब्दुल साजेद यांच्या जागी प्रमोद राठोड यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला. प्रमोद राठोड यांनी आज विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे स्वीकारली, तेव्हा अब्दुल साजेद गैरहजर होते.

अवघ्या एक महिन्यापूर्वी काँग्रेसने दिलेल्या यादीच्या आधारेच अब्दुल साजेद यांची या पदावर निवड करण्यात आली होती. मात्र त्यानंतर साजेद यांनी पक्षाने ठरविलेली स्थायी समितीतील नावे परस्पर बदलल्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचा राजीनामा मागितला.

साजेद यांनी प्रारंभी राजीनामा देण्यास चालढकल केली. पण काँग्रेसने राठोड यांना या पदावर पाठिंबा देत असल्याचे पत्र महापौर अनिता घोडेले यांना देऊन साजेद यांना दूर केले.

close