‘राजनीती’ने जमवला गल्ला

June 7, 2010 2:59 PM0 commentsViews: 2

7 जून

अनेक वादानंतर रिलीज झालेल्या राजनीती सिनेमाचा झेंडा बॉक्स ऑफिसवर चांगलाच फडकला.

जवळ-जवळ 85 टक्क्यांचे ओपनिंग या सिनेमाला मिळाले. पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी राजनीतीच्या गल्ल्यात 10 कोटी जमा झाले.

शनिवारी 11 कोटी तर रविवारी या सिनेमाने तब्बल 12 कोटी रुपये कमावले.

एकूणच 40 कोटींत बनलेल्या या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात 34 कोटी रुपयांची दणदणीत कमाई केली.

पहिल्याच आठवड्यात एवढेजबरदस्त ओपनिंग मिळवणारा थ्री इडियट्सनंतरचा हा दुसराच सिनेमा.

राजनीतीला मल्टीप्लेक्ससोबतच सिंगल स्क्रीन थिएटरमध्येही चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्थातच याचा चांगला परिणाम सिनेमाच्या एकंदर कमाईवर होत आहे.

close