कसाबसाठी वकील नियुक्त

June 8, 2010 11:19 AM0 commentsViews: 2

8 जून

27/11च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याच्यासाठी आता वकिलाची नियुक्ती करण्यात आली आहे.

अमिन सोलकर आणि फरहाना शहा हे आता कसाबचे वकील असतील.

हायकोर्टाने ही नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र स्टेट लिगल सेल ऍथॉरिटी यांनी या दोन वकिलांची नियुक्ती केली आहे.

कसाबने कायदेविषयक मदत केंद्राकडे वकिलाची मागणी केली होती.

हायकोर्टात सेशन कोर्टाने दिलेल्या शिक्षेविरोधात आव्हान देण्यासाठी ही वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.

close