रणबीर आणि संजय दत्त एकदम डिट्टो

February 16, 2017 4:10 PM0 commentsViews:

16 फेब्रुवारी : संजय दत्तच्या चरित्रपटात त्याची भूमिका साकारणारा रणबीर कपूर आता भूमिकेत शिरायला लागलाय. चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली नसली तरी रणबीरच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग केले जातायत. त्याचं बोलणं-चालणं संजय दत्तसारखं दिसावं यासाठी टीम भरपूर मेहनत घेतेय.

या मेहनतीनंतर त्याची चेहरापट्टी आणि त्याची शारीरिक हालचाल संजूबाबासारखी झाल्याचं दिसतंय. त्याने चित्रपटासाठी 14 किलो वजन वाढवलंय. संजय दत्तचे सिनेमे तो बघतोय. त्याच्या वेगवेगळे 250 व्हिडीओ त्यांनी आत्तापर्यंत पाहिलेत.

रणबीर आपली भूमिका नीट करु शकेल की नाही याबाबत खुद्द संजय दत्तला शंका आहे. आता रणबीरसाठी ते आव्हान झालं आहे. त्यासाठी तो घेत असलेली मेहनत हळूहळू दिसू लागलीये. पाहा संजय दत्तच्या घरातून बाहेर पडताना त्याचे टिपलेले हे फोटो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close