नवा आयफोन, स्मार्ट आणि स्वस्त

June 8, 2010 12:09 PM0 commentsViews:

8 जून

ऍपलने आयफोनची नवीन स्मार्ट आणि स्वस्त व्हर्जन लाँच केली आहे. याची किंमत आहे, फक्त 199 डॉलर्स म्हणजे जवळपास 9 हजार रुपये.

आयफोन – 4 आधीच्या सगळ्या आयफोन्सपेक्षा वेगळा आहे. हा आयफोन स्लिम तर आहेच, पण यामध्ये पहिल्यांदाच व्हिडिओ चॅटिंगचाही ऑप्शन आहे.

फोन 2 व्हर्जन्समध्ये मिळेल. 16 जीबीच्या आयफोनची किंमत असेल, 9 हजार रुपये. तर 32 जीबीची किंमत असेल 299 डॉलर्स म्हणजे सुमारे 13 हजार रुपये.

हा आयफोन एकदम स्लिम आहे आणि याची बॉडी मजबूत प्लास्टिकपासून तयार करण्यात आली आहे.

नवीन आयफोन 24 जूनला अमेरिकेत लाँच होईल आणि भारतासह इतर देशांमध्ये त्यानंतर लाँच केला जाईल.

close