जगातील उंच टॉवर मुंबईत

June 8, 2010 1:28 PM0 commentsViews: 10

8 जून

लोढा डेव्हलपर्सने आज जगातील सर्वात उंच रेसिडेन्शियल टॉवर बांधण्याची घोषणा केली आहे.

मुंबईतील गिरणगावात हा उंच टॉवर उभा राहणार आहे. वर्ल्ड वन असे या टॉवरचे नाव असेल.

मुंबईत लोअर परेलमध्ये हा उंच टॉवर उभा राहणार आहे. 2014मध्ये हा टॉवर बांधून पूर्ण होईल. आणि यासाठी 2 हजार कोटी रुपये खर्च होतील.

या बिल्डिंगमधील घरांसाठी बुकिंग याच जूनच्या अखेरीस सुरू होणार आहे.

या टॉवर्सची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –

जगातील सर्वात उंच रेसिडेन्शियल टॉवर

साधारणपणे 2014 पर्यंत बिल्डींगचं बांधकाम पूर्ण होणार

टॉवर उभा राहणार, लोअर परेलमधील श्रीनिवास मिलच्या 17 एकर जागेवर

टॉवर असेल 117 मजली

टॉवरची उंची असेल, 1 हजार 476 फूट

टॉवरमधील घरांची कमीत कमी किंमत असेल, साडेसात कोटी आणि जास्तीत जास्त, 50 कोटी

टॉवरमध्ये असणार 3 आणि 4 बीएचके फ्लॅटस्

सध्या जगातील सर्वात उंच रेसिडेन्शिअल टॉवर आहे, ऑस्ट्रेलियात. त्याचे नाव आहे, क्विन्सलँड नंबर वन… आणि त्याची उंची आहे, 322 मीटर म्हणजेच 1056 फूट…

close