ट्रम्प यांच्यामुळे अस्थिरतेची शक्यता – उर्जित पटेल

February 17, 2017 1:23 PM0 commentsViews:

urjit1

17 फेब्रुवारी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे जगात आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते, असं भाकित रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी वर्तवलंय.

आशिया खंडाची राजधानी बऱ्यापैकी अमेरिकेवर अवलंबून आहे आणि त्यांच्या धोरणांचा परिणाम जगभर होतो.तसं झालं तर परिस्थिती चिघळू शकते, अमेरिकेत व्याजदरही वाढू शकतात, आणि तसं झालं तर भारतावरही त्याचा परिणाम होईल, असं पटेल म्हणाले.

दरम्यान, भारतात महागाईचा दर ४ टक्क्यांवर आणायचं ध्येय रिझर्व बँकेपुढे आहे, असंही पटेल म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close