‘सामना’वर बंदीची मागणी चुकीची, नायडूंचा घरचा अहेर

February 17, 2017 1:52 PM0 commentsViews:

vankya_naidu17 फेब्रुवारी : निवडणूक काळात सामना वृत्तपत्र छापू नये ही मागणी चुकीची आहे असं सांगत भाजपचे केंद्रीय नेते व्यंकय्या नायडू यांनी घरचा अहेर दिला.

मुंबई महापालिकेच्या आखाड्यात शिवसेना विरुद्ध भाजप युद्ध रंगलंय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनावर निवडणुकीच्या तीन दिवस बंदी आणावी अशी मागणीच भाजपने निवडणूक आयोगाकडे केलीये. आता मात्र त्यांचे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी राज्यातील नेत्यांचे चांगलेच कान उपटले. शिवसेनाला सामनातून काय छापायचं ते छापू देत, लोक काय ते ठरवतील असं सांगत नायडू यांनी भाजप नेत्यांना समजावलं.

तसंच  भाजपवर टीका आणि काँग्रेसचं कौतुक ही शिवसेनेची भूमिका न कळणारी आहे पण भाजप वाढतोय याची धास्ती सेनेनं घेतलीय, असंही ते म्हणालेत. काँग्रेस बुडतं जहाज आहे म्हणून अनेक काँग्रेस नेते भाजपमध्ये येत आहेत. शरद पवार बुद्धिमान आहेत पण भाजप मध्ये बुद्धिमान लोकांची गर्दी आहे अशी टिप्पणीही नायडू यांनी केली. तर  मुळा मुठा हे कसलं नाव ते बदला जसं बॉम्बेचं मुंबई केलं तसं करा अशी अजब मागणीही नायडू यांनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close