राज्य मराठी विकास संस्थेची स्पर्धा वादात

June 8, 2010 2:23 PM0 commentsViews: 6

8 जून

राज्य मराठी विकास संस्थेची वेबसाईट स्पर्धा आता वादात सापडली आहे.

या संस्थेने मराठीतील चांगल्या वेबसाईटसाठी एक स्पर्धा घेतलेली होती. या स्पर्धेचे पहिले पारितोषिक जाहीर झाले, यशदा या संस्थेच्या वेबसाईटला.

पण यशदाची वेबसाईट मराठीऐवजी इंग्रजीतून अधिक माहिती देते. अशा वेळी या वेबसाईटला बक्षीस कसे जाहीर झाले, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

काही व्यक्तींनी याला आक्षेपही घेतला आहे. तो नोंदवण्यासाठीच त्यांनी आज राज्य मराठी विकास संस्थेचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांची मुंबईत भेट घेतली.

दरम्यान येत्या पंधरा दिवसांतच या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा विचार होता. पण आता यावर आक्षेप नोंदवला गेल्यामुळे या कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

close