पुढील 100 वर्षांत युएई मंगळावर वसवणार शहर

February 17, 2017 3:51 PM0 commentsViews:

mars17 फेब्रुवारी : दोनच दिवसांपूर्वी भारताने 104 उपग्रह एकावेळी यशस्वीरित्या अवकाशात सोडून एका नव्या जागतिक विक्रमाची नोंद केली. भारतापाठोपाठ आता आखाती देशही अवकाश संशोधन क्षेत्रात एक मोठं आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचलणार असल्याचं कळतंय.

संयुक्त अरब अमीरातीने 2117 पर्यंत मंगळ ग्रहावर शहर वसवण्याचा निर्धार जाहीर केला आहे. पुढच्या काही दशकांत सामान्य नागरिकांनाही मंगळाची सफर घडवण्याचा त्यांचा मानस आहे.

यूएईचे उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री आणि दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मख्तूम आणि अबूधाबीचे राजे आणि यूएईचे उप सुप्रीम कमांडर शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी गुरूवारी या 100 वर्षांच्या राष्ट्रीय योजनेबाबत माहिती दिली.

विविध तज्ज्ञ आंतरराष्ट्रीय संघटना आणि वैज्ञानिक संस्था यांची या योजनेत मदत घेण्यात येणार आहे. भविष्यात लोकांना मंगळ ग्रहावर घेऊन जाण्याची योजना यशस्वी करण्यासाठी युएईतर्फे एक राष्ट्रीय कॅडर तयार करण्यात येणार आहे. दुबईत पार पडलेल्या जागतिक सरकार शिखर संमेलनात या योजनेची जाहीर घोषणा करण्यात आली. या संमेलनात 138 सरकार, 6 आंतरराष्ट्रीय संघटना आणि काही तंत्रज्ञान कंपनींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अवकाशातील इतर ग्रहांवर पाऊल ठेवण्याचे मानवाचे स्वप्न सत्यात उतरावे यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना मजबूत करणे हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे असे शेख मोहम्मद बिन राशिद यांनी सांगितले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close