शहांची संपत्ती वेबसाईटवर,तुमची कुठे?, दानवेंचं उद्धवना सवाल

February 17, 2017 6:28 PM0 commentsViews:

 danve_on_sena
17 फेब्रुवारी : अमित शहांची संपत्ती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आहे. तुमची संपत्ती कुठे आहे ? असा खोचक सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलीय. ते नाशिकमध्ये बोलत होते.

नाशिकमध्ये पार पडलेल्या प्रचार सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर एकच हल्लाबोल केला. अमित शहा यांची संपत्ती जाहीर करा, अशी मागणी सेना करतेय. पण    अमित शहा यांची संपत्ती जाहीर करायची गरज नाही. शहा यांची संपत्ती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आधीच जाहीर करण्यात आलेली आहे. पण तुमची संपत्ती शोधायची कुठे? असा सवाल रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना केलाय. तसंच तुमची संपत्ती कुठं ठेवली आहे? याचाच शोध घ्यायची वेळही आल्याचा टोला दानवे यांनी लगावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close