कानडी दंडेलशाही, मराठा मोर्च्यात भाषण करणाऱ्या मुलींवर कारवाईचा इशारा

February 17, 2017 7:20 PM0 commentsViews:

marath_morcha_belgum18 फेब्रुवारी : बेळगावमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरुच आहे. मराठा क्रांती मोर्च्यात भडक भाषण केली असेल तर कारवाई करण्याचा इशारा कर्नाटक पोलिसांनी दिलाय.

बेळगावमध्ये काल (गुरुवारी) मराठा क्रांती मोर्चाचा विराट मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाच्या प्रथेप्रमाणे 7 मराठी मुलींनी नेतृत्व केलं होतं. तसंच त्यांनी भाषणही केलं होतं. मात्र, आता कर्नाटक पोलिसांनी या मुलींनी भडकावू भाषण केल्याचा संशय व्यक्त केलाय. भाषणांच्या ध्वनीफीती तपासन्याचे काम सुरू आहे. जर या मुलींनी भडक भाषणं असतील तर संयोजकांवर कडक कारवाई करण्याचा पोलीस उपायुक्त जी राधिका यांनी इशारा दिलाय. पोलिसांच्या दंडेलशाहीमुळे सीमाभागात संतापाची लाट उसळलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close