सेना-भाजपची लुटूपुटूची लढाई; दानवे म्हणतात, ‘हे’ तर निवडणुकीपुरतेचं’

February 17, 2017 7:39 PM0 commentsViews:

danve_on_sena_nsk17 फेब्रुवारी : राजकारणात कुणी कुणाचं शत्रू किंवा मित्र कायम नसतो. शिवसेनेसोबतचे आरोप प्रत्यारोप निवडणुकीपुरतेचं असल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलंय.

शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर दोन्हीकडच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार चिखलफेक सुरू केलीये. कौरव-पांडवापासून ते औकात काढण्यापर्यंत एकमेकांवर टीका केली गेलीये. मात्र, दुसरीकडे अमित शहा यांनी ही फ्रेंडली मॅच असल्याचं म्हणून मलमपट्टी करण्याचं काम केलं. आता रावसाहेब दानवे शहांच्या पावलावर पाऊल ठेवलंय.

आम्ही युती करण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय. परंतु, शिवसेनेनं युती तोडण्याचा निर्णय जाहीर केला. युती तुटल्यामुळे सेना आमच्यावर बेछुट टीका करत आहे. पण, राजकारणात कुणी कुणीचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. निवडणुका चालू आहे. आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्यामुळे निवडणूक संपली की आरोप प्रत्यारोप बंद होतील असं दानवेंनी म्हटलंय.

त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी आणि इतर मित्र पक्षांशीही भाजपचे चांगले संबंध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. दानवेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिवसेना भाजपमध्ये लुटूपुटूची लढाई तर सुरु नाही ना अशी चर्चा सुरू झालीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close