थ्री इडियट्स पुस्तकरुपात

June 8, 2010 2:49 PM0 commentsViews: 7

8 जून

आयफा ऍवॉर्ड्समध्ये थ्री इडियट्स वर्षातील सर्वोत्तम सिनेमा ठरला. फक्त बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर ऍवॉर्ड्स पटकवण्यातही या सिनेमाने वर्चस्व गाजवले.

हाच थ्री इडियट्स सिनेमा आता आपल्याला पुस्तकातूनअनुभवता येणार आहे. थ्री इडियट्स नावाच्या या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत करण्यात आले.

या पुस्तकात थ्री इडियट्सचा अख्खा स्क्रीन प्ले आहे. यावेळी थ्री इडिअटस् सिेनमाची स्टार कास्ट हजर होती. फक्त कमतरता जाणवत होती, ती आमीर खानची.

ओम प्रकाशनने या पुस्तकाचे प्रकाशन केले. आता गुरुदत्तच्या सिनेमांवरही पुस्तक काढले जाणार आहे. या वेळी आपण क्लासिक सिनेमांचे डॉक्युमेंटेशन करणार असल्याचे सिनेमाचे निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी सांगितले.

close