भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहीमेचं काऊंटडाऊन सुरू

October 20, 2008 1:20 PM0 commentsViews: 42

दिनांक 20 ऑक्टोबर, श्रीहरीकोटा -22 ऑक्टोबरला सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं असेल ते भारताच्या चांद्रयान वनच्या लॉन्चिंगवर. ही चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यावर भारत चंद्रावर सॅटेलाईट पाठवणारा जगातला पाचवा देश ठरणार आहे. चांद्रयान वन भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा बिग बजेट प्रोजेक्ट आहे. ज्यावर 386 कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. गेली आठ वर्ष इस्त्रोचे शास्त्रज्ञ, चांद्रयान प्रोजेक्टवर संशोधन करत आहेत. त्यातूनच भारताकडून चंद्रावर उतरणारा, पहिला मानवविरहित सॅटेलाईट चांद्रयान वन बनवण्यात आला. चांद्रयान वनचे वजन 1380 किलो आहे. 22 ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी चांद्रयान वन श्रीहरीकोटाहून अवकाशात सोडलं जाईल. चांद्रयान वनला घेऊन संपूर्ण भारतीय बनावटीचं, पीएसएलवी-सी 11 हया रॉकेटने टेक ऑफ करेल. पृथ्वीपासून 3,84000 किलोमीटर अंतरावर चंद्र आहे. श्रीहरीकोटाहून टेक ऑफ केल्यानंतर, सतरा दिवसांनी चांद्रयान वन चंद्राच्या कक्षेत स्थिरावेल. त्यानंतर चांद्रयान वनमधील इम्पॅक्टर चंद्रावर आदळवला जाईल. त्यातून निर्माण झालेल्या धुरळ्यावर भारतीय शास्त्रज्ञ संशोधन करणार आहेत. भारत पहिल्यांदा चंद्राचा भौगोलिक आणि रासायनिक अभ्यास करणार आहे. त्यासाठी टप्याटप्याने चांद्रयान वन, टू, थ्री अशा सिरीज घेतल्या जातील. 2014 भारत मानवरहित रॉकेटने, लूनर सॅटेलाईट चंद्रावर पाठवणार आहे. त्यावेळी पहिला भारतीय चंद्रावर पाऊल ठेवेल. आतापर्यंत चंद्रावर अमेरिका, रशिया यांनी आपले मानवरहित रॉकेट तर चीन, जपान यांनी मानवविरहित रॉकेट उतरवले आहेत. आता या सुपर पॉवर देशांच्या यादीत भारताचाही समावेश होणार आहे.

close