वसईला पाणी पुरवणारी पाईपलाईन फुटली

June 8, 2010 2:53 PM0 commentsViews: 3

8 जून

वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणारी सूर्या पाईपलाइन विरारजवळ फुटली आहे.

त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वसई, नालासोपारा आणि विरार या शहरांमध्ये पाणीपुरवठा बंद आहे.

काही ठिकाणी अगदीच कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू आहे. काशिद-कोपर या गावात ही पाईपलाइन फुटली आहे.

गेल्या 15 दिवसांत पाईपलाईन फुटण्याची ही दुसरी घटना आहे.

close