पुण्यात आयडिया ऑफिसची मोडतोड

June 8, 2010 2:58 PM0 commentsViews: 4

8 जून

पुण्यात आयडिया या मोबाईल कंपनीकडून एका तरुणाला राष्ट्रगीताचा अपमान करणारा एक अश्लिल एसएमएस आला. त्यानंतर त्या तरुणाने डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

याचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी आयडियाच्या ऑफिसवर मोर्चा नेला.

त्यावेळी संतप्त जमावाकडून आयडियाच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली.

आयडिया ही सेवा बंद करावी आणि माफी मागावी, अशी मागणी निदर्शकांनी केली. त्यानंतर झाल्या प्रकाराबद्दल आयडियाने माफी मागितली.

close