नाशिककरांच्या मनात भीती कायम

June 8, 2010 3:11 PM0 commentsViews: 4

दीप्ती राऊत, नाशिक

8 जून8 जून हा दिवस नाशिककरांसाठी कायमचा लक्षात राहिला आहे. अज्ञात गुंडांनी पार्किंगमधील गाड्या पेटवण्याच्या प्रकाराला एक वर्ष पूर्ण झाले आहे. ती भिती आजही येथील लोकांच्या मनातून पुसली गेलेली नाही.

वाहनांच्या जाळपोळीनंतर बराच गदारोळ झाला. कुठे गुंडांना पोसणार्‍या राजकारणार्‍यांना हद्दपार करण्यात आले, तर कुठे हद्दपारीच्या नावाखाली राजकारण खेळण्यात आले. काहींनी राजाश्रय मिळवत आपली तडीपारी रद्द करवून घेतली. पण या घटनेतील लोकांना मात्र यातून स्वत:च सावरावे लागले.

काहींना इन्शुरन्सचे पैसेही मिळाले नाहीत. तर काहींनी घाबरून घर शिफ्ट केले. पण भरून न येणारे नुकसान झाले, ते मनात कोंडलेल्या भितीचे…

close