धोणीचे बाईकस्टंट वादात

June 8, 2010 4:02 PM0 commentsViews: 1

8 जून

भारतीय क्रिकेट टीमची मैदानावरची कामगिरी सध्या चांगली होत नाही. आणि त्यातच मैदानाबाहेरही टीम वादग्रस्त ठरत आहे.

यावेळी खुद्द कॅप्टन महेंद्र सिंग धोणी वादात सापडला आहे. खतरों के खिलाडी या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी बीसीसीआयने काही खेळाडूंना परवानगी नाकारली होती. पण आता धोणीच खुलेआम रस्त्यावर मोटर बाईक वरून स्टंटबाजी करताना दिसला.

एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान धोणीला काही बाईकवरचे स्टंट करायचे होते. आणि धोणीने ते केलेही…अजून तरी बीसीसीआयच्या बॉसेसचे लक्ष धोणीच्या या स्टंटकडे गेलेले दिसत नाही.

close